शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विलासराव जगताप भाजपसाठी अदखलपात्र, आमदार विक्रमसिंह सावंतांचे टीकास्त्र

By श्रीनिवास नागे | Updated: July 17, 2023 18:14 IST

सरकार असूनही पाठपुरावा केला नाही

जत : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेच्या पाण्यातून जत तालुक्यातील सहा ते सात तलाव भरले आहेत. त्यामुळे मी कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा केला. जेथून सहज पाणी मिळू शकेल तेथे प्रयत्न सुरू आहेत. मात्र विलासराव जगताप यांनी त्यांचे सरकार असताना कुठल्याच कामासाठी पाठपुरावा केला नाही. मुळातच ते भाजपसाठी अदखलपात्र आहेत, अशी टीका आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.यंदा तालुक्यात दुष्काळाचे भीषण सावट आहे. शेतकऱ्यांना मदतीची खरी गरज आहे. यासाठी लाक्षणिक उपोषण व रास्ता रोको आंदोलन केले. शिवाय याचे राजकीय भांडवल करावे, अशी आमची कोणतीच मनोभावना नाही. जगताप यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी याचेही भांडवल केले. मुळात सरकार त्यांचेच असताना त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पाठपुरावा करणे गरजेचे होते. मात्र आम्ही सरकार नसताना शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या एकच भावनेने कर्नाटक व महाराष्ट्र सरकारकडे सतत प्रयत्न करतो आहे. कदाचित जतला न्याय न देणाऱ्या लोकांच्या मनात हे खुपत असावे असे वाटते.सावंत म्हणाले, तालुक्यातील महावितरणची समस्या, कृषी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केली आहे. जलसंपदा विभागाशी संपर्क करून वारंवार म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले. याशिवाय विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. जनतेने ही सर्व ओळखले आहे. त्यामुळे आता तुमची नौटंकी थांबवावी.यावेळी आप्पाराया बिराजदार, सभापती सुजय शिंदे, सरदार पाटील, बाबासाहेब कोडग, अशोक बन्नेनवर, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, बिराप्पा शिंदे, सलीम पाच्छापुरे, परशुराम मोरे, दिलीप सोलापुरे, मारुती पवार, शिवकुमार तंगडी आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस