शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या कॉन्व्हेंट शाळेतून विहानचा आटपाडीच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:43 IST

विद्यार्थी भारावले : शासकीय शाळांमधील गुणवत्तेचा पालकांकडून आदर

लक्ष्मण सरगरआटपाडी : शिक्षणाच्या शोधात अनेक पालक आपली मुलं परदेशातील प्रतिष्ठित शाळांमध्ये घालतात. मात्र, परदेशात स्थायिक असूनही आपल्या मुलाला मातृभाषेत शिक्षण मिळावं म्हणून भारतात परत येण्याचे पाऊल कुणी उचलत नाही. आटपाडी तालुक्यात सोमवारी नेमकं असंच विलक्षण व कौतुकास्पद पाऊल एका पालकांनी उचललं. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबीयांनी आपला मुलगा विहान याला थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये दाखल केलं.

विहान याचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती हे दोघंही सध्या न्यूयॉर्कमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. विहान याचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथील हॉक रिज प्राथमिक शाळेत सुरू झालं होतं. मात्र, मराठी भाषेशी त्याचं व शिक्षणाशी घट्ट नातं तयार व्हावं, मातीत रुजलेली मूल्यं आत्मसात व्हावीत, या उद्देशाने पालकांनी विहानचं शिक्षण काही काळासाठी भारतातच, तेही मराठी माध्यमातून करायचा असा निर्णय घेतला.

त्यामुळे विहानला त्याचे मामा डॉ. उमेश बालटे यांच्या गावी, म्हणजेच आटपाडीत आणण्यात आलं. सांगोला हे शेळके कुटुंबाचं मूळ गाव असलं तरी आजोळ आटपाडी असल्याने जिल्हा परिषदशाळा क्रमांक १ ची निवड त्याच्यासाठी करण्यात आली. सोमवारी विहानसह इतर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबफूल देऊन स्वागत करण्यात आलं.

मुलाला मराठी कसलेच बोलता येत नाही. त्याचा संभाळ करत असतानाही अनेक अडचणी येत असल्याने व आपल्या मातीशी मुलाची नाळ जोडली जावी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी विहानचा प्रवेश आटपाडी येथील मराठी शाळेत घेतला. - डॉ. उमेश बाटले, विहानचे मामा