ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:06 IST2018-09-04T01:05:51+5:302018-09-04T01:06:51+5:30

Veteran union leader Bapusaheb Magadoom passes away | ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांचे निधन

सांगली : येथील हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम (वय ८७) यांचे सोमवारी रात्री अकरा वाजता निधन झाले. ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. बाबा आढाव यांच्या सोबत त्यांनी हमालांच्या हक्कासाठी व प्रश्नावर अनेक आंदोलने केली व त्यांना सन्मान मिळवून दिला. समाजवादी, पुरोगामी कष्टकरी, कामगार यांचे नेते म्हणून त्यांची जिल्ह्यात, राज्यात ओळख होती. जिल्ह्यातील पुरोगामी, समाजवादी संघटनेचा आधारवड गेल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने समाजवादी, पुरोगामी परिवाराचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी १० वाजता पंचमुखी मारुती रोड वरील कष्टकऱ्यांची दौलत येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Web Title: Veteran union leader Bapusaheb Magadoom passes away