शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, पृथ्वीराज पाटील यांचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 18:05 IST

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली. त्यांच्या घरातील व्यक्ती ...

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली. त्यांच्या घरातील व्यक्ती लढत असली, तरी त्यांनी तटस्थ रहायला हवे होते. त्यांनी बंडखोरांचा उघड प्रचार केला. लोकसभेला त्यांना सर्वांनी केलेल्या मदतीची जाणीव त्यांनी ठेवली नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.ते म्हणाले, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा, वसंतदादांचा बालेकिल्ला होता. वसंतदादांच्या वारसांनी तो उद्ध्वस्त करायला हातभार लावला. त्यांच्या घरातील एका महिलेने बंडखोरी केली. अपक्ष खासदारांनी माझ्या विरोधात उघड भूमिका घेतली. प्रचार शुभारंभ, सांगता सभेला जाहीरपणे ते व्यासपीठावर गेले. भाषणे केली. त्यांचे सगळे माजी नगरसेवक, पदाधिकारी उघडपणे प्रचार करत होते. माजी मंत्री प्रतीक पाटील बॅक ऑफिस सांभाळत होते. पत्रकार परिषदा घेत होते. भाजपच्या विरोधात न बोलता माझ्याविरोधात बोलत होते. वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, हे दुर्दैवी आहे. आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहोत. वीस वर्षांनंतर सांगलीत काँग्रेस जिंकण्याची स्थिती होती, वातावरण पोषक होते. मात्र, जे घडले ते सर्वांसमोर आहे. बंडखोरी रोखण्यात प्रदेश स्तरावरूनही अपयश आले.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना खासदार करण्यासाठी आमदार विश्वजीत कदम, विक्रमसिंह सावंत, मी आम्ही सर्वांनी मिळून ताकद लावली. त्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. भाजपने सांगलीत षङ्यंत्र रचले. काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्याचे पुरावेच आम्ही दिले. प्रदेश काँग्रेस नेत्यांसमोर ही सगळी वस्तुस्थिती मांडली आहे. जयश्रीताई पाटील यांनी निवडणूक लढवून काय साध्य केले. डिपाॅझिट जप्त झाले. निवडणूक लढविली नसती, तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीcongressकाँग्रेसvishal patilविशाल पाटील