कळंबीत पोषण आहार अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:32 IST2021-09-10T04:32:05+5:302021-09-10T04:32:05+5:30

मालगाव : कळंबी (ता. मिरज) येथे पोषण आहार अभियानांतर्गत विविध कार्यक्रम पार पडले. पोषण आहारासंबंधी महिला ...

Various programs under Kalambit Nutrition Campaign | कळंबीत पोषण आहार अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

कळंबीत पोषण आहार अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

मालगाव : कळंबी (ता. मिरज) येथे पोषण आहार अभियानांतर्गत विविध कार्यक्रम पार पडले. पोषण आहारासंबंधी महिला अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

कळंबी येथील प्राथमिक शाळेत मिरज पंचायत समितीचे सदस्य कृष्णदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सरपंच योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पोषण आहार व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धांना महिलांचा प्रतिसाद मिळाला. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या महिला अधिकारी साळुंखे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. उपसरपंच अमोल माळी, ग्रामपंचायत सदस्य डी. एन. पाटील, स्वप्नील पाटील, रीना दानोळे, तेजश्री सुतार कार्यक्रमास उपस्थित होते. सारिका पाटील व कस्तुरी पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, अंगणवाडी सेविका व मदतनीस या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

Web Title: Various programs under Kalambit Nutrition Campaign