फोटो ओळ : भागाईवाडी (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या जन्म दिनी विराज नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा विधानसभेचे आमदार आणि विश्वास व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, पुस्तक वाटप करून मतदार संघातील गावांमध्ये अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा शिराळा यांच्या वतीने पुस्तकांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तालुक्यातील १५ आदर्श शाळांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा चिखली येथून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
आरळा येथे वाढदिवसानिमित्त कोविड काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. आरोग्यसेवक, आशासेविका व कोविड साथीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज दादा नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसभापती बाळासाहेब नायकवडी, विश्वास कारखाना संचालक शिवाजी पाटील, सरपंच आनंदा कांबळे, उपसरपंच सदाजी पाटील, रामभाऊ बडदे, एम.एन. पाटील, डॉ.मंजित परब उपस्थित होतेे.
ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन विराज नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी शहाजी गायकवाड, धनश्री माने, डॉ.धनंजय माने, शशिकांत शेटे उपस्थित होते.
भागाईवाडी येथे मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने विराज नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे व्यवस्थापक प्रकाश पाटील, सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच रामचंद्र पाटील, श्रीकांत पाटील, पोलीस पाटील सुनील लुगडे, उत्तम पाटील, बाजीराव चव्हाण, शारदा पाटील उपस्थित होते. करुंगली येथे मिठाईचे वाटप करण्यात आले.