शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
2
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
3
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
4
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
5
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
7
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
8
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
9
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
10
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
11
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
12
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
13
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
14
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
15
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
16
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
17
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
18
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
20
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
Daily Top 2Weekly Top 5

वारणाली रुग्णालय निविदेविरुद्ध दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची दरनिश्चिती व कार्यारंभ आदेशाबाबत जिल्हा न्यायालयात दाखल दावा फेटाळण्यात आला. सामाजिक ...

सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची दरनिश्चिती व कार्यारंभ आदेशाबाबत जिल्हा न्यायालयात दाखल दावा फेटाळण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हणमंत सरगर यांनी आयुक्तांना दरनिश्चितीचे अधिकार नाहीत, अशी याचिका दाखल केली होती. या रुग्णालयाबाबत सर्वच न्यायप्रविष्ट बाबी संपुष्टात आल्याने महापालिकेने बांधकामाला सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून महापालिकेला पाच कोटी रुपयांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले. हे रुग्णालय कुपवाडमध्ये बांधण्याचा निर्णय झाला. वारणाली की वाघमोडेनगर असा जागेचा वाद रंगला. तब्बल सात वर्षे हा वाद सुरू आहे. तत्कालीन आयुक्तांनी रुग्णालयाबाबत बोटचेपी भूमिका घेतल्याने निर्णय झाला नाही. विद्यमान आयुक्त नितीन कापडणीस यांनी मात्र रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. वारणाली येथील जागेतच रुग्णालय बांधण्यास शासनानेही मान्यता दिली. त्यानंतर जागेच्या मूळ मालकासह काहीजणांनी न्यायालयात दावे दाखल केले. काही दिवसांपूर्वी मूळ मालकाचा दावा फेटाळला होता.

सामाजिक कार्यकर्ते हणमंत सरगर व इतरांनी निविदेची दरनिश्चिती व कार्यारंभ आदेश देण्याचा अधिकार आयुक्तांना नाही, असा मुद्दा उपस्थित करीत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली. महापालिकेतर्फे मुख्य कायदा सल्लागार अ‍ॅड. एस. एस. मेहता यांनी युक्तिवाद केला. महापालिका अधिनियमातील ४५० ‘अ’ मध्ये दुरुस्ती झाली असून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत प्रशासकीय मान्यतेचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. शासनाने तसे आदेशही काढले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी राबविलेली प्रक्रिया योग्य आहे. या सर्व बाबी न्यायालयात मांडण्यात आल्या, असे अ‍ॅड. मेहता यांनी सांगितले. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत सरगर यांचा दावा फेटाळला. रुग्णालय बांधकामातील सर्वच अडचणी आता दूर झाल्याने महापालिकेने बांधकामाला सुरुवात केली आहे.