शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरज पंयात समिती सदस्य अपहरणप्रकरणात वनखंडे, शेजूळ यांची नावे; अटकेतील चौघांचा जबाब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:24 IST

प्रा. वनखंडे ‘नॉट रिचेबल’

सांगली : मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगाव (ता. मिरज) चे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याप्रकरणी संशयित समीर अकबर होनवाडे (वय २७, रा. नरवाड), अजित मुर्ग्याप्पा कट्टीकर (वय २७), आनंद ऊर्फ गोटू बाबू गावडे (वय २७), प्रशांत बाबासाहेब क्षीरसागर (वय २०, तिघे रा. मालगाव) या चौघांना अटक केली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषणने चौघांची कसून चौकशी केल्यानंतर शिंदेसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख प्रा. मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून अपहरण केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून वनखंडे व शेजूळ यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिस याचा तपास करत होते. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या.मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर रात्री अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांना प्रथम मिरजेत आणून नंतर सांगलीत सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला. इंगळे यांचे अपहरण करून त्यांना गोव्यात नेले होते. या अपहरण प्रकरणात संशयित अपहरण प्रकरणात समीर व्हनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांचा सहभाग असल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हटले होते.या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला होता. सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून संशयित समीर होनवाडे, अजित कट्टीकर, आनंद ऊर्फ गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर या चौघांना अटक केली. अटकेतील चौघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेचे प्रा. मोहन वनखंडे व पंचायत समितीच्या उपसभापतींचा मुलगा अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून इंगळे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. चौघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामुळे अपहरण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात प्रा. वनखंडे व शेजूळ या दोघांवर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रा. वनखंडे ‘नॉट रिचेबल’पंचायत समिती सदस्य इंगळे यांच्या अपहरण प्रकरणात प्रा. वनखंडे आणि अनिल शेजूळ यांचा सहभाग असल्याचा जबाब अटकेतील चौघांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्रा. वनखंडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मोबाइल स्वीच ऑफ असल्याचे उत्तर मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Panchayat Samiti Member Abduction Case Exposes Vanakhande, Shejul's Involvement

Web Summary : Four arrested in Sangli's Panchayat Samiti member abduction case named Shiv Sena's Mohan Vanakhande and Ajit Shejul. The victim was allegedly taken to Goa before being released. Police investigation is ongoing, with potential action against Vanakhande and Shejul.