पाडळीच्या सरपंच पदावर वंदना कुलकर्णी यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:48+5:302021-02-11T04:28:48+5:30
विटा : खानापूर विधानसभा मतदार संघातील पाडळी (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना देवदास कुलकर्णी यांची तर उपसरपंचपदी अजित पंढरीनाथ ...

पाडळीच्या सरपंच पदावर वंदना कुलकर्णी यांची वर्णी
विटा : खानापूर विधानसभा मतदार संघातील पाडळी (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना देवदास कुलकर्णी यांची तर उपसरपंचपदी अजित पंढरीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाडळी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत श्री सिध्देश्वर परिवर्तन ग्रामविकास पॅनलने ५ जागा जिंकल्या होत्या तर विरोधी गटाला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते.
नूतन सदस्यांची विशेष सभा मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी आनंदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सरपंच पदासाठी वंदना कुलकर्णी तर उपसरपंच पदासाठी अजित पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी कुलकर्णी व पाटील यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर गायकवाड, पौर्णिमा धोत्रे, रझिया मुलाणी, निशिकांत पाटील, भाऊसाहेब पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, शरद शिंदे, माजी उपसरपंच लिंबाजी पाटील, छाया यादव, विनोद धोत्रे, महादेव पाटील, किरण पाटील, धनाजी पाटील, संतोष यादव, बबन पाटील, नेताजी पाटील, गणेश यादव, चंद्रकांत सावंत उपस्थित होते.
फोटो - १००२२०२१-विटा-पाडळी सरपंच निवड : पाडळीच्या सरपंचपदी वंदना कुलकर्णी तर उपसरपंचपदी अजित पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.