इस्लामपुरात वैभव पवार यांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:41+5:302021-06-02T04:21:41+5:30

इस्लामपूर: शहरातील विजयभाऊ पाटील हेल्थ क्लब आणि जयंत पाटील एन. ए. क्रीडा मंडळाकडील नगरपालिकेच्या इमारती ठरावाप्रमाणे प्रशासनाने ताब्यात घ्याव्यात, ...

Vaibhav Pawar's fast postponed in Islampur | इस्लामपुरात वैभव पवार यांचे उपोषण स्थगित

इस्लामपुरात वैभव पवार यांचे उपोषण स्थगित

इस्लामपूर: शहरातील विजयभाऊ पाटील हेल्थ क्लब आणि जयंत पाटील एन. ए. क्रीडा मंडळाकडील नगरपालिकेच्या इमारती ठरावाप्रमाणे प्रशासनाने ताब्यात घ्याव्यात, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या नगरसेवक वैभव पवार यांनी या ठरावावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर अपील दाखल असल्याने उपोषण स्थगित केले.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या पालिका सभेत वरील इमारतीबाबत बेकायदेशीर ठराव करताना नगरपालिका अधिनियमांचा भंग झाल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी त्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाकडून मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीच कार्यवाही न केल्याने पवार मंगळवारी पालिकेच्या प्रवेशद्वारावर उपोषणास बसले होते.

मात्र नगराध्यक्ष पाटील आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी या ठरावावर संबंधित संस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले आहे. त्यावर ९ जून रोजी सुनावणी होणार आहे. त्याचा निर्णय लागल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्याने पवार यांनी उपोषण स्थगित केले.

Web Title: Vaibhav Pawar's fast postponed in Islampur