शिराळ्यात दुपारनंतर लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:11+5:302021-04-09T04:29:11+5:30

शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालय,तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शिराळा उपजिल्हा रुग्णालय यामध्ये गुरुवार दि. ८ ...

Vaccination in Shirala in the afternoon | शिराळ्यात दुपारनंतर लसीकरण ठप्प

शिराळ्यात दुपारनंतर लसीकरण ठप्प

शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालय,तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शिराळा उपजिल्हा रुग्णालय यामध्ये गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता कोरोना लस संपल्याने लसीकरण ठप्प झाले आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील व उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांच्याकडून समजलेली माहिती अशी की, उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी ९५ ते ११० नागरिक लसीकरण करून घेतात. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये देखील आसपासच्या गावातील नागरिक येऊन लसीकरण करून घेतात. मात्र गुरुवारी शिराळा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये २० लसी आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र मध्ये काही ठिकाणी ८, १०, १२, १५ इतक्याच लसी शिल्लक होत्या.

गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून लस संपल्यामुळे कोरोनावरील लसीकरण थांबवण्यात आले. सांगली सिव्हिलकडून जोपर्यंत लसीचा पुरवठा होत नाही, तोपर्यंत नागरिकांना लस उपलब्ध होणार नाही. शुक्रवारी दुपारी किंवा शनिवारी सकाळपासून कोरोनावरील लसीकरण पूर्ववत सुरू होईल, अशी शक्यता आहे, असे सांगण्यात आले आहे. तोपर्यंत तालुक्यातील नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. कोरोनावरील अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या सुरू आहेत. नागरिकांनी त्रास जाणवू लागल्यानंतर दिरंगाई न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी भेट द्यावी आणि योग्य ते औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination in Shirala in the afternoon