जिल्ह्यात आजपासून ४१ केंद्रांवर ज्येष्ठांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:06+5:302021-03-04T04:51:06+5:30

ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना १ मार्चपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाने तयारी सुरू केली ...

Vaccination of senior citizens at 41 centers in the district from today | जिल्ह्यात आजपासून ४१ केंद्रांवर ज्येष्ठांचे लसीकरण

जिल्ह्यात आजपासून ४१ केंद्रांवर ज्येष्ठांचे लसीकरण

ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना १ मार्चपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून, नोंदणी वाढत आहे. पहिले दोन दिवस महानगरपालिका क्षेत्रातील १३ आणि ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा १० ठिकाणी सध्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आरोग्य विभागाकडे अद्याप ३२ हजार कोविशिल्डचे डोस शिल्लक आहेत. शासकीय रुग्णालयांसोबत खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातूनही कोरोनाचे लसीकरण करण्यात येईल, त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांतून लसीकरण सुरू झाल्यानंतर मोहिमेला अधिक गती मिळणार आहे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक आणि व्याधी असलेल्या नागरिकांसाठी सोमवारपासून कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

चौकट

जिल्ह्यातील लसीकरण केंद्र

ग्रामीण भागात कोकरूड, नेर्ले, खंडेराजुरी, हिंगणगाव, चरण, डफळापूर, संख, देशिंग, कुरळप, देशिंग, दिघंची, ढालगाव, बोरगाव, बावची, उमदी, बिळूर, वाळवा आणि खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, इस्लामपूर व कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय, शिराळा, आटपाडी, जत, कडेगाव, विटा, पलूस, आष्टा, तासगाव आणि चिंचणी-वांगी ग्रामीण रुग्णालय

चौकट

महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र

जामवाडी हेल्थ पोस्ट, हनुमाननगर, शामरावनगर, साखर कारखाना, मिरज अर्बन, द्वारकानगर मिरज, समतानगर, इंदिरानगर, विश्रामबाग व अभयनगर हेल्थ पोस्ट.

Web Title: Vaccination of senior citizens at 41 centers in the district from today