कसबे डिग्रजमध्ये दीडहजार जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:54+5:302021-04-18T04:24:54+5:30

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील आरोग्य केंद्रात आजपर्यंत १५३० जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी ...

Vaccination of one and a half thousand people in Kasbe Degradation | कसबे डिग्रजमध्ये दीडहजार जणांना लस

कसबे डिग्रजमध्ये दीडहजार जणांना लस

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील आरोग्य केंद्रात आजपर्यंत १५३० जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच नागरिक उपस्थित राहत आहेत.

लसीकरण मोहिमेसाठी ग्रामपंचायतीकडून चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था समाज मंदिर येथे करण्यात आली आहे. खुर्च्या, पाण्याची व्यवस्था तसेच सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. केंद्रावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत लसीकरणासाठी येणाऱ्यांशी अडीअडचणीविषयी चर्चा केली. यावेळी आनंदराव नलावडे यांनी लसींची संख्या वाढविण्याबरोबरच सरसकट सर्वांना लस मिळावी, अशी मागणी केली. लसीकरण मोहीम सुरळीत सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. शरद कुंवर यांनी दिली. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आरोग्य सेवक मनोज कोळी, गटप्रमुख शाहीन जमादार, रेखा परीट, सचिन गुरव आशासेविका यांचे सहकार्य मिळत आहे.

फोटो : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे लसीकरण केंद्रावर नागरिकांशी चर्चा करताना आनंदराव नलावडे व डॉ. शरद कुंवर आदी.

Web Title: Vaccination of one and a half thousand people in Kasbe Degradation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.