शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Corona vaccine Sangli :अठरा वर्षावरील लसीकरण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:05 IST

Corona vaccine Sangli : शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तो पर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देअठरा वर्षावरील लसीकरण लांबणीवर जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टता

सांगली  : 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार होते. कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार होती. तथापि, सध्यस्थितीत लसींच्या उलब्धतेबाबतची मर्यादा लक्षात घेता. जो पर्यंत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तो पर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.18 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सदरची माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलीद पोरे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सध्या 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु असून ज्यांना पहिला डोस दिला आहे. त्यांचा दुसरा डोस विहित वेळेत देण्यात येत आहे. यावयोगटातील नागरीकांचे लसीकरण पुर्वीप्रमाणे सुरु राहील. 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठीच्या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर तसेच याबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर या वयोगटालाही तात्काळ लसीकरण करण्यात येईल तो पर्यंत या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन त्यांनी केले.जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या महामारीच्या काळात सेवा बजावत आहेत याची जाणिव प्रत्येक नागरीकांनी ठेवली पाहिजे. अशा कर्मचाऱ्याबरोबर, वाद घालणे, हुज्जत घालणे, अपमानास्पद वागणूक देणे, तुच्छतेने बोलणे असे प्रकार केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.जिल्ह्याला नव्याने 45 व्हेंन्टीलेटर प्राप्तजिल्ह्याला सध्या 45 व्हेंटीलेटर नव्याने प्राप्त झाले असून यापैकी 25 व्हेंन्टीलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात येणार उर्वरीत 20 व्हेंन्टीलेटर जिल्ह्यातील रुग्णालयांना वितरीत करण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यात 35 ते 40 टन ऑक्सिजन वापरात येते आवश्यकतेनुसार साठा जेमतेम उलब्ध करुन घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे 75 टक्के लसीकरण झाले आहे. लस टंचाईमुळे 18 वर्षावरील नागरिकांना 1 मे पासून करण्यात येणारे लसीकरण पुढे जाण्याची शक्यता असून या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी या वयोगटासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन ऐवजी प्री रजिस्ट्रेशची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर रजिस्ट्रेशन होणार आहे. गावाला जेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होणार आहे. त्याप्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करुन नये. रजिस्ट्रेशन प्रक्रियेत शिक्षकांनी खुप मोठी भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.

झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु आहे. लसीकरण प्रक्रिया पुर्वीप्रमाणेच सुरु राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी प्रसंगानुरुप कठोर भूमिका घेवून कंन्टेमेंट झोन प्रक्रिया राबविण्याची अंमलबजावणी करावी असेही ते यावेळी म्हणाले.दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे दिनांक 29 एप्रिल रोजीही लसीकरण बंद राहील. लोकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी