शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'उसाला ३५०० रुपये दरासाठी कारखाना अध्यक्षांना जाब विचारणार'

By अशोक डोंबाळे | Updated: May 29, 2023 18:05 IST

जादा दरासाठी १ जुलैपासून आंदोलन छेडणार

सांगली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपलेल्या हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दराची मागणी साखर कारखान्याच्या अध्यक्षांकडे करायची आहे. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना कारखानाकडे जादा दरासाठी १ जुलैपासून आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शेतकरी संघटना सहकार आघाडीप्रमुख संजय कोले यांनी दिला.खा. शरद जोशी, शेती तंत्रज्ञानाचे अभ्यासक अजित नरदे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीत त्यांना अभिवादन केले. यावेळी शेतकऱ्यांसमोर संजय कोले बोलत होते.संजय कोले म्हणाले, साखरेला दर चांगला मिळत असून, इथेनॉल, वीज निर्मिती प्रकल्पापासून कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. यामुळे सर्व साखर कारखानदारांना मागील गळीत हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे सहज शक्य आहे. म्हणूनच कारखानदारांकडे हक्काच्या ऊस दरासाठी लढा उभारणार आहे. तसेच कृषी पंपाला वीज सवलत देत असल्याची शासनाची घोषणा बोगस आहे. ठरावीक युनिट, हॉर्स पॉवर, घरगुती, व्यावसायिक, लघुदाब, उच्चदाब असा वीजदरातील फरक बंद करून एकसमान दराने सर्वांना वीज देण्याची गरज आहे. असे झाले तर महावितरणचा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येणार आहे. अणुवीज प्रकल्प होऊ नये म्हणून कोळसा खाण सम्राट १,५०० कोटी रुपये राज्यकर्त्यांना देण्याची तयारी दर्शवतात. या पैशावरून राजकारण्यांत वाद होतात. ही गंभीर बाब असून, अणुप्रकल्प न झाल्यास कमी दरात पुरेशी वीज मिळणे शक्य होणार नाही. हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावे. हे प्रकल्प होण्यासाठी रेटा वाढवावा लागेल, असेही ते म्हणाले.अर्जुन नरदे, अशोक जाधव, ज्ञानदेव पाटील, बाळासो चव्हाण, संजय गायकवाड, रावसो दळवी यांनीही ऊस उत्पादकांना मार्गदर्शन केले. शीतल राजोबा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सिद्धापा दानवाडे, शंकर कापसे, चंद्रकांत शिरोटे, अशोक पाटील, बाबा पाटणे, किसन पाटील, चारू बिरणाले, एकनाथ कापसे, सदाशिव माळी, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

साखर उताऱ्यातील गोलमाल संपवाअमित राशिनकर, साखर कारखान्यांचे इथेनॉल हे मुख्य उत्पादन व साखर उपपदार्थ बनणार आहे. उसाला एकसमान दर न देता गुजरातप्रमाणे उशिरा तुटणाऱ्या उसाला जादा दर द्यायला पाहिजे. तसेच साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यातील गोलमाल संपवण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेagitationआंदोलन