शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

'ट्रम्प टेरिफ'मुळे उद्योजक चिंतेच; सांगली जिल्ह्यातून निर्यात होणारी उत्पादने कोणती, किती कोटींचा बसणार फटका.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:20 IST

भारत सरकार अमेरिकेशी चर्चा करून यातून मार्ग काढेल, अशी उद्योजकांना आशा

प्रसाद माळीसांगली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला २५ टक्के टेरिफ अर्थात आयात कर यामुळे भारतीय उद्योजकांबरोबर जिल्ह्यातील उद्योजकांवर चिंतेचे ढग दाटले आहेत. सांगली जिल्ह्यातून सहाशे कोटी प्रत्यक्ष, तर नऊशे कोटींची अप्रत्यक्ष, अशी एकूण १५०० कोटी उत्पादनांची निर्यात अमेरिकेत होते. या वाढीव २५ टक्के टेरिफच्या धोरणाचा थेट परिणाम येथील उद्योजकांवर होणार आहे. यामुळे १५०० कोटींची उलाढाल व तीन ते चार हजार जणांच्या रोजगारावर संकट निर्माण होऊ शकते.जिल्ह्यातून प्रामुख्याने वसंतदादा औद्यागिक वसाहत, मिरज औद्योगिक वसाहत, गोंविदराव मराठे औद्यागिक वसाहत, कुपवाड औद्यागिक वसाहत आदींमधील काही उद्योगांतून थेट अमेरिकेला ६०० कोटींच्या उत्पादनाची प्रत्यक्ष निर्यात होते. तर, ९०० कोटींच्या उत्पादनाचा कच्चा माल येथे तयार होऊन अन्यत्र त्याची पक्क्या मालाची प्रक्रिया होऊन अमेरिकेला निर्यात होते. याचा थेट परिणाम येथील उद्योगांवर अमेरिकेने लावलेल्या २५ टक्के टेरिफमुळे होणार आहे. त्यामुळे येथील उद्योजकांवर चिंतेचे ढग आता दाटले आहेत. भारत सरकार अमेरिकेशी चर्चा करून यातून मार्ग काढेल, अशी आशा येथील उद्योजकांना वाटत आहे.

निर्यात होणारी उत्पादनेकापड, रेडिमेंट गारमेंट, फ्रॉन्ड्री साहित्य, ऑटोमोबाइल पार्ट्स, रबर, प्लास्टिक, हार्डनसे टेस्टिंग मशिन, स्पशेल पर्पज मशिन, स्टेपलॉन.

उत्पादन निर्यात केले जाणारे देशअमेरिका, जर्मनी, युरोप, दुबई, सौदी अरेबिया, पेरु, नायजेरिया

याचा नकारात्मक परिणामच होणार आहे. याशिवाय त्यांचा दंड लावण्याचा विचार आहे. भारत त्यांच्याशी तोडगा काढू शकले नाही, तर आम्ही अमेरिकेला आयात कर २५ टक्के भरू व केंद्र सरकारने ते आम्हाला ड्युटी ड्रॉबॅकच्या स्वरूपात परत करावे. ज्याने निर्यात व येथील उद्योगांवर होणारा परिणाम जाणवणार नाही. निर्यात होत राहील व अमेरिकेच्या ग्राहकांवरही त्याचा परिणाम होणार नाही. - संजय अराणके, संचालक, हिंदुस्तान नाॅयलॉन्स उद्योग, मिरज एमआयडीसी. 

अमेरिकेने टेरिफ कमी केले नाही, तर मोठा फटका येथील उद्योगांवर बसेल. पण, एकाच देशावर अधिक निर्भर न राहता इतर देशांतील नवे स्त्रोत शोधले पाहिजेत. त्यांची गरज ओळखून तिकडे निर्यात वाढवली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. तरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा काळ जाऊ शकतो. - विनोद पाटील, अध्यक्ष, सांगली-मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

यातून शासनाने चर्चा करून मार्ग काढावा. जर निघाला नाही, तर इतर देशांचा जो टेरिफ आहे. तो गृहीत धरून आपल्या टेरिफमध्ये सहा ते सात टक्यांची वाढ राहिल, ती केंद्र सरकारने आम्हाला ड्रॉबॅक किंवा रोटेबमध्ये कराची रक्कम परत करावी. तर उद्योगांना दिलासा मिळेल. - सतीश मालू, अध्यक्ष कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स, कुपवाड.

अमेरिकेचा २५ टक्के लावलेला आयात कर ही भारतातील उद्योजकांनी संकट म्हणून नव्हे, तर सुवर्ण संधी म्हणून पाहावी. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार या देशातील नागरिकांनी भारतातच उत्पादित हाेणाऱ्या मालाची खरेदी करावी. त्या शिवाय परदेशी देशांना भारताचे महत्त्व कळणार नाही. - सचिन पाटील, अध्यक्ष वसंतदादा पाटील औद्योगिक वसाहत.