बफरस्टॉकच्या नावाखाली जिल्ह्यात युरियाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:44+5:302021-05-13T04:26:44+5:30

सांगली : सध्या द्राक्ष, उसासाठी युरियाची गरज असून, दुकानदार मात्र युरियाची टंचाई असल्याचे सांगत आहेत. होलसेल खत विक्रेत्यांच्या माहितीनुसार ...

Urea scarcity in the district under the name of Bufferstock | बफरस्टॉकच्या नावाखाली जिल्ह्यात युरियाची टंचाई

बफरस्टॉकच्या नावाखाली जिल्ह्यात युरियाची टंचाई

सांगली : सध्या द्राक्ष, उसासाठी युरियाची गरज असून, दुकानदार मात्र युरियाची टंचाई असल्याचे सांगत आहेत. होलसेल खत विक्रेत्यांच्या माहितीनुसार खरिपात युरियाची टंचाई नको, म्हणून राज्य शासन बफरस्टॉक करीत आहे. त्यामुळे सध्याच्या गरजेकडे दुर्लक्ष होत आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे सध्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच खरीप हंगामात युरियाची टंचाई नको, म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्याला बफर स्टॉक करण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यासाठी २५ हजार टन युरियाची गरज आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात सात हजार टन युरिया जिल्ह्यात आला. तेव्हा बफरस्टॉक केला नाही, पण मे महिन्यात कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार बफर स्टॉक केला जात आहे. आता दोन हजार टन युरिया आला असून, त्यापैकी १२०० टनाचा बफर स्टॉक केला असून, उर्वरित ८०० टन कृषी दुकानदारांना दिला आहे. दुकानदारांना कमी प्रमाणात मिळाल्यामुळे तो शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. सध्या ऊस, द्राक्षासह अन्य पिकांना युरियाची गरज आहे. शेतकऱ्यांकडून मागणीही जास्त असल्यामुळे बफरस्टॉकऐवजी विक्रीसाठी युरिया देण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.

चौकट

टंचाई नाही

शासनाच्या सूचनेनुसार हंगामात गैरसोय होऊ नये, म्हणून युरियाचा बफर स्टॉक केला जात आहे. टंचाईत त्याचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सात हजार टन आणि मे महिन्यात ८०० टन पुरवठा झाला आहे. प्रत्येक दुकानदारांकडे युरिया आहे, अशी माहिती जिल्हा परिषोचे कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

Web Title: Urea scarcity in the district under the name of Bufferstock