मिरजेत सेवासदन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:49+5:302021-07-01T04:18:49+5:30
ओळ : मिरजेतील सेवासदन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सीटीस्कॅन मशीनचे अनावरण डॉ. रविकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निकीत मेहता, ...

मिरजेत सेवासदन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे अनावरण
ओळ : मिरजेतील सेवासदन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सीटीस्कॅन मशीनचे अनावरण डॉ. रविकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निकीत मेहता, डॉ. अमृता दाते उपस्थित हाेते.
मिरज : मिरजेतील सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधे अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे अनावरण करण्यांत आले. या अत्याधुनिक मशीनने जलद व अधिक गुणवत्तापूर्ण स्कॅन होत असल्याने रुग्णाचे रोगनिदान व पर्यायाने उपचारात अधिक अचूकता येते. रस्ते अपघातात इजा झाल्यास व मेंदू, फुप्फुस, हृदय, यकृत, किडनी अशा विविध अवयवांच्या तसेच रक्तवाहिन्या संबंधित आजारांमध्ये या मशीनद्वारे निदानास मदत होते.
सांगली-मिरजेत एनएबीएच या वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेले सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल एकमेव आहे. या हॉस्पिटलद्वारे रुग्णांना अत्याधुनिक, योग्य व जलद उपचारासाठी अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करण्यांत आल्याचे हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रविकांत पाटील यांनी सांगितले.
रेडिओलॉजिस्ट डॉ. निकित मेहता म्हणाले, या मशीनमुळे एक्स-रे किंवा पूर्वीच्या सीटी स्कॅनपेक्षा अंतर्गत अवयवासंबंधित अधिक तपशील मिळेल. ज्याचा उपयोग उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि रुग्णांना होईल. यात रुग्णाच्या शरीराची थ्रीडी प्रतिमा मिळत असल्याने अचूक निदान व उपचारासाठी मदत होणार आहे. यावेळी हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमृता दाते, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. साक्षी पाटील, डॉ. दीपा पाटील, योगेश पाटील, सुनील जाधव, रेडिओलॉजिस्ट डॉ. नताशा मेहता यांच्यासह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.