शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्षबागांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:13 IST

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली

सांगली : जिल्ह्यात गुरुवारी रात्री सांगली, मिरज शहरास कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा निर्यातक्षम द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.द्राक्षबागांच्या छाटणीवेळीही अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्नातून द्राक्षबागा वाचविल्या आहेत. तोपर्यंत गुरुवारी रात्री साडेसात वाजल्यानंतर जवळपास अर्धातास सांगली, मिरज शहरांसह कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात पाणी साचल्याने ऊसतोडी रखडल्या आहेत, तर ऐन फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांच्या हंगामालाही फटका बसणार आहे.जिल्ह्यातील पूर्व भागासह काढणीला आलेले आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज शहरात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली.कवठेमहांकाळला अर्धा तास हजेरीशिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, कोंगणोळी, करोली टी, शिंदेवाडी, म्हैसाळ एम. परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारपासून कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांमध्ये यामुळे भीती निर्माण झाली आहे

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी