मांजर्डेतील दुहेरी खुनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:14+5:302021-07-09T04:18:14+5:30
दि. ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मांजर्डे गावातील बसस्थानक चौकाजवळ अजितकुमार बाबूराव साळुंखे (वय ४८, रा. मांजर्डे) आणि तानाजी ...

मांजर्डेतील दुहेरी खुनाचा उलगडा
दि. ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मांजर्डे गावातील बसस्थानक चौकाजवळ अजितकुमार बाबूराव साळुंखे (वय ४८, रा. मांजर्डे) आणि तानाजी शिवराम शिंदे (६३, रा. आरवडे, ता. तासगाव) या दोघांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. याबाबत तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मांजर्डे, आरवडे गावातील खबऱ्यांच्या मदतीने तसेच परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे रोहित कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला बुधवारी अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र अद्याप खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
न्यायालयाने १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम करीत आहेत.