शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Unlock : दुकानाच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत करणार, सांगलीत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:33 IST

Unlock : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगली येथील पत्रकार परिषदेत कोरोनाचं संकट अद्याप आहेच. त्यामुळे, पूरग्रस्त भागात आपण आणखी टेस्ट वाढविणार आहोत, डॉक्टरांचे कॅम्प लावणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ठळक मुद्देअशा धमक्यांना मी मनावर घेत नाही. कारण, माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाची चिंता आहे. जीव वाचविण्यासाठी जेव्हा धावपळ करावी लागते. राज्यात 1250 ते 1300 मेट्रीक टन ऑक्सिजन आपण उत्पादीत करू शकतो

मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे घोषणाच केली आहे. राज्यातील दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, त्यासोबतच, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं तेच नियम लागू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीसांगली येथील पत्रकार परिषदेत कोरोनाचं संकट अद्याप आहेच. त्यामुळे, पूरग्रस्त भागात आपण आणखी टेस्ट वाढविणार आहोत, डॉक्टरांचे कॅम्प लावणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळी, दुकानाच्या वेळा वाढवून द्या, अन्यथा दुकाने उघडू असा व्यापाऱ्यांनी इशारा दिला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आलो होता. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच उत्तर दिलं.  

अशा धमक्यांना मी मनावर घेत नाही. कारण, माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाची चिंता आहे. जीव वाचविण्यासाठी जेव्हा धावपळ करावी लागते. राज्यात 1250 ते 1300 मेट्रीक टन ऑक्सिजन आपण उत्पादीत करू शकतो. जेव्हा दुसऱ्या लाटेत पीक गाठलं होतं, तेव्हा 1700 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता. म्हणजे, 500 मेट्रीक टन ऑक्सिजन आपल्याला लागत होता. हे आणणं खूप कठीण होतं, इथे कोणी मदतीला येत नाही. मी व्यापाऱ्यांच दु:ख, वेदना समजू शकतो, पण त्यावेळेला कुठलंही ऑक्सिजनचं दुकान उघडं नव्हतं. म्हणून मला ही काळजी घ्यावी लागते.   नागरिकांचे जीव वाचवणं हे महत्त्वाच आहे, त्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते. पुढच्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पटीने ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोविड नियमांचं पालन बंधनकारक आहे. आज आपण एक आदेश काढत आहोत, दुकानाच्या वेळा रात्री 8 पर्यंत करणार आहोत. मात्र, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत नाही, तिथं रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं पूर्वीचेच नियम व बंधन लागू राहतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्रीच निर्णय घेतील - वडेट्टीवार 

राज्यात सातत्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट होताना दिसते आहे. सध्या ७६ हजार ७५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही, असं मंत्री विजय वडेट्टीवर यांनी सांगितलं आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. ऑगस्टच्या शेवटपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. फक्त चर्चा झाली, असं सांगतानाच टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस