शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अनोखा विवाह सोहळा; फुलांच्या अक्षता अन् पुस्तकांचा रुखवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:40 IST

विट्यात मराठा समाजाकडून समाजोपयोगी पायंडा

सांगली : लग्नसमारंभात पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता आणि अन्नाची नासाडी होत असल्यामुळे या गोष्टींना फाटा देऊन तांदळाऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तूंऐवजी पुस्तकांचा रुखवत देऊन मराठा समाजाने नवा पायंडा पाडला आहे. शिवाय, यातून वाचलेला तांदूळ अंधशाळा व अनाथालयाला देऊन सामाजिक कार्याचा वस्तुपाठही निर्माण केला.मराठा सोशल ग्रुपचे मार्गदर्शक ए. डी. पाटील यांच्या नात्यातील मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील यशवंत नामदेव पाटील यांची कन्या योगिता आणि आष्टा येथील दिलीप शिवाजी माने यांचे पुत्र रोहन यांचा हा अनोखा विवाह सोहळा विट्यात पार पडला. विवाहाच्या तयारीवरून बराच विचारविनिमय झाला. सत्यशोधक चळवळीत काम करणाºया ए. डी. पाटील यांनी वधू आणि वर पक्षाकडील सर्वच कुटुंबियांचे प्रबोधन केले. या लग्नात अक्षतांच्या जागी फुले बरसली आणि संसारोपयोगी साहित्याच्या रुखवताला हद्दपार करून ज्ञानरूपी संसारसमृद्धीचा मंत्र देत पुस्तकांचा रुखवत तयार झाला. फुलांचा सडा अक्षतांच्या माध्यमातून पडला. त्यामुळे तांदळाची नासाडी टळली असून हा उपक्रम अनुकरणीय आहे.या अनोख्या विवाहसोहळ्यामुळे परिसरात सत्यशोधक चळवळीचा वारसा अजूनही जिवंत असल्याची प्रचिती येत होती. विवाहासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमध्येही या उपक्रमाचे कौतुक होताना पहायला मिळाले.विचारांचा जागरया विवाह सोहळ्यात विचारांचा जागरही करण्यात आला. अशा पद्धतीचा परंपरेला छेद देणारा विवाह का करावा लागला, महात्मा फुले यांनी मांडलेले विचार काय आहेत, प्रगतीचा कोणता मार्ग निवडायला हवा, अशा अनेक बाजूंनी विचारमंथन झाले.प्रत्येक लग्नात सरासरी ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. महाराष्टÑात दरवर्षी सुमारे चार लाख लग्ने होतात. प्रत्येक समारंभाचा विचार केला तर, अक्षतांच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्टÑात २० लाख किलो तांदूळ पायदळी तुडवून वाया घालवितो. दुसरीकडे दुर्गम भागातील लहान मुले अन्नावाचून कुपोषित आहेत.

टॅग्स :marriageलग्नmarathaमराठा