मिरजेत रस्ता दुरुस्तीसाठी चिखलात लोळत अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST2021-07-15T04:20:03+5:302021-07-15T04:20:03+5:30
मिरज : मिरजेत रेल्वे स्थानकासमोर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रिपाइंचे महापालिका क्षेत्र उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी रस्त्यावरील चिखलात लोळून अनोखे आंदोलन ...

मिरजेत रस्ता दुरुस्तीसाठी चिखलात लोळत अनोखे आंदोलन
मिरज : मिरजेत रेल्वे स्थानकासमोर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रिपाइंचे महापालिका क्षेत्र उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी रस्त्यावरील चिखलात लोळून अनोखे आंदोलन केले.
मिरजेत पावसाने रस्त्यांची दैना उडाली आहे. रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर पावसाचे व ड्रेनेजचे सांडपाणी वाहत आहे. रस्त्यांतील चिखलात वाहने अडकत आहेत. रस्त्याची अपूर्ण कामे, खोदलेल्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य, खड्डे, त्यात साचणारे पावसाचे पाणी यामुळे नागरिक संतप्त आहेत. महापालिका प्रशासनाकडे व स्थानिक नगरसेवकाकडे तक्रारी करूनही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. रेल्वे स्थानकासमोर खराब रस्ता व येथील ड्रेनेज यंत्रणा नादुरुस्त असल्याने या परिसरात पावसाचे पाणी साचते. महापालिका अधिकाऱ्यांकडून रस्ते व ड्रेनेज समस्या दूर करण्याचे आश्वासन देण्यात येते, मात्र समस्या कायम असल्याने संतोष जाधव यांनी रेल्वेस्थानक रस्त्यावर चिखलात लोळत आंदोलन केले.
रिक्षा संघटनेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले, इकबाल खतीब, मेहबूब खतीब, सदाम पठाण, मोजम मुतवली, राजू परदेशी, अशोक गोटे, बिंदू परदेशी, राजू कांबळे, गुंडू काशीद, अनमोल कांबळे, हुसेन शेख, अर्जुन कोळी उपस्थित होते.