शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी; शरद पवारांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:05 IST

माझ्या पक्षाची ताकद नरेंद्र मोदी यांनाच कळली

सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रविवारी सांगली दौरा होता. सांगलीत पत्रकार परिषदेत आठवले यांनी महायुतीवर थेट नाराजी व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे मात्र भरभरून कौतुक केले. आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत आहे. त्यामुळेच मला तीन वेळा मंत्रिमंडळात घेतले, असेही ते म्हणाले.रामदास आठवले म्हणाले, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीत आणि महाराष्ट्रातही पद मिळत नाही. राज्यात एक मंत्रिपद अथवा महामंडळ मिळायला हवे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेसाठी एकही जागा दिली नाही. आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. सत्तेचा वाटा आम्हाला मिळायला हवा होता. शरद पवार यांच्या काळात काँग्रेस आघाडीबरोबर असताना सहा ते सातजण विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. मंत्रीदेखील झाले. आघाडीच्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. पण, महायुतीच्या काळात आरपीआयला सत्तेत संधी मिळत नाही. याबद्दल माझे कार्यकर्ते खूपच नाराज आहेत.आंबेडकरांनी ‘रिपब्लिकन’चे नेतृत्व करावेरामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष सुरू झाला. रिपब्लिकन पक्षामध्ये विविध गट आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व गटांनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. यासाठी मंत्रिपद सोडावे लागले तरी चालेल, कारण समाजापेक्षा पद मोठे नाही. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व एकत्र येतील अशी शक्यता काही वाटत नाही. रिपब्लिकनचे गट एकत्र येऊ शकतात मी त्यासाठी प्रयत्नशील आहे.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुती