पतंगरशासनाच्या विचाराधीन‘तासगाव’ चालविण्याची ‘सोनहिरा’ची तयारी
By Admin | Updated: July 29, 2014 00:03 IST2014-07-28T23:53:37+5:302014-07-29T00:03:36+5:30
वसंतदादा कारखान्याच्या अडचणींबाबत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्याशी चर्चा

पतंगरशासनाच्या विचाराधीन‘तासगाव’ चालविण्याची ‘सोनहिरा’ची तयारी
सांगली : तासगाव कारखान्याबाबत कामगार नेत्यांशी यापूर्वीच चर्चा झाली आहे. सक्षम कारखाना प्रशासनाकडे अडचणीतील कारखाने चालविण्यास देता येऊ शकतात. तसा निर्णय शासनाकडून होत असेल, तर सोनहिरा सहकारी साखर कारखान्यामार्फत तासगाव कारखाना चालविण्यास आमची तयारी आहे, वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज, सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
वसंतदादा कारखान्याच्या अडचणींबाबत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी कारखान्याची २१ एकर जागा विक्रीसाठी काढली असली, तरी त्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. अशाप्रकारे जागा विक्रीस शासन परवानगी देऊ शकते त्यामध्ये कोणती अडचण येईल, असे वाटत नाही. यापूर्वीही काही कारखान्यांच्या जागाविक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. राज्यातील अडचणीत असलेले साखर कारखाने सक्षम कारखान्यांना चालविण्यास द्यावेत, असा स्पष्ट निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे असे कारखाने सक्षम प्रशासनाच्या ताब्यात देता येऊ शकतात. तरीही बिले व कामगारांच्या पगाराचे प्रश्न यांसह अन्य आर्थिक अडचणींबाबत सहकार खाते, कारखाना प्रशासन आणि कृती समिती योग्य तो निर्णय घेईल. शिराळ््यातील नागपंचमीबाबत ते म्हणाले की, उच्च न्यायालयाचे आदेश हे मानावेच लागतील. कायद्यात शिथिलता आणता येते की नाही, या गोष्टीवर आपण भाष्य करणे योग्य नाही, पण तूर्त आदेश पाळणेच आपल्या हाती आहे. आघाडीबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीच निर्णय घेणार असल्याने इतरांनी दंगा करण्यात अर्थ नाही. त्यांनी कितीही दंगा केला, तरी त्याचा निर्णयावर परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले. जागाबदलाबाबत अद्याप कोणतीही चर्चा आघाडीमध्ये झाली नाही. तरीही सक्षम उमेदवार असतील तिथे जागांची अदलाबदल होऊ शकते, असे कदम यांनी सांगितले.