corona virus-सांगलीत अघोषित बंदीचे चित्र, चौक, रस्ते ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:49 IST2020-03-17T15:49:30+5:302020-03-17T15:49:48+5:30
सार्वजनिक आस्थापना, शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा बंद झाल्यामुळे तसेच कोरोना आजाराबद्दलच्या भीतीमुळे शहरातील वर्दळ कमालीची घटली आहे. सार्वजनिक कार्यक्रमही होत नसल्याने प्रमुख चौक, रस्ते दिवसभरात अनेकवेळा ओस पडल्याचे चित्र आहे.

corona virus-सांगलीत अघोषित बंदीचे चित्र, चौक, रस्ते ओस
सांगली : सार्वजनिक आस्थापना, शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा बंद झाल्यामुळे तसेच कोरोना आजाराबद्दलच्या भीतीमुळे शहरातील वर्दळ कमालीची घटली आहे. सार्वजनिक कार्यक्रमही होत नसल्याने प्रमुख चौक, रस्ते दिवसभरात अनेकवेळा ओस पडल्याचे चित्र आहे.
शासन आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाबत दक्षतेच्या उपाययोजना म्हणून सार्वजनिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, व्यायामशाळा, जलतरण तलाव, क्रीडा प्रशिक्षण सत्र, शिबिर यांना ३१ मार्चपर्यंत निर्बंध घातले आहेत.
याशिवाय गर्दीचे कार्यक्रम टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. याचा परिणाम आता शहरातील वर्दळीवर झाला आहे. शहरातील प्रमुख चौक, मार्ग, उद्याने, क्रीडांगणे ओस पडली आहेत. सांगलीचे आमराई उद्यान, प्रतापसिंह उद्यान, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, आंबेडकर स्टेडियम यांच्यासह शहरातील विविध महाविद्यालयीन क्रीडांगणावरही दिवसभर शुकशुकाट दिसून आला.