शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शासनाच्या मदतीशिवाय चिंचोलीत काष्ठशिल्पांचे अनोखे संग्रहालय-: अशोक जाधव यांचा उपक्रम-जागतिक संग्रहालय दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:04 PM

संग्रहालये म्हटली की, ती फक्त शहरातच पाहायला मिळतात. परंतु चिंचोली (ता. शिराळा) या खेडेगावात शासनाच्या मदतीशिवाय शहरी संग्रहालयाला लाजवेल असे संग्रहालय चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी साकारले

ठळक मुद्देविविध वस्तूंचाही संग्रह, देश-परदेशातील काड्यापेट्यांचा भन्नाट संग्रहजागतिक कीर्तीच्या भारतीय संपदांची छायाचित्रे

गंगाराम पाटील ।वारणावती : संग्रहालये म्हटली की, ती फक्त शहरातच पाहायला मिळतात. परंतु चिंचोली (ता. शिराळा) या खेडेगावात शासनाच्या मदतीशिवाय शहरी संग्रहालयाला लाजवेल असे संग्रहालय चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी साकारले आहे.

दि. १८ रोजी जागतिक संग्रहालय दिन साजरा होत आहे, या पार्श्वभूमीवर जाधव यांनी साकारलेल्या संग्रहालयाचा घेतलेला आढावा. या त्यांच्या संग्रहालयात पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावरील साकारलेले अप्रतिम व्यक्तिचित्र, कृत्रिमतेची जोड न देता साकारलेली नैसर्गिक आविष्काराची अफलातून काष्ठशिल्पे, जुन्या दुर्मिळ लाकडी वस्तूंचा संग्रह, देश-परदेशातील काड्यापेट्यांचा भन्नाट संग्रह, जगातील अनेक संग्रहालयांची माहिती, भारतीय व पाश्चिमात्य चित्रकार, शिल्पकार यांच्या माहितींची उपयुक्त कात्रणे, चित्रकलेविषयी माहितीची पुस्तके, सहा शास्त्रीय नृत्यांच्या वेगवेगळ्या भावमुद्रांची छायाचित्रे, अनेक कवितासंग्रह, कादंबऱ्या व इतर पुस्तकांचा खजाना, जागतिक कीर्तीच्या भारतीय संपदांची छायाचित्रे, दिल्ली येथील प्रसिद्ध वास्तुकलेची छायाचित्रे, मध्य प्रदेशातील २४ महालांची छायाचित्रे, पारंपरिक खेळण्यांची छायाचित्रे, लोककलांची छायाचित्रे यांचा सामवेश आहे. या साºया वैविध्यपूर्ण खजान्याची पर्वणी महाराष्ट्रातील चिंचोलीसारख्या एका खेडेगावात विनाशुल्क कलाप्रेमींना पाहता येईल.केवळ आजच संधीहे सर्व प्रकारचे संग्रह आजच्या दिवशीच पाहायला ठेवण्यात आले आहेत. जागेअभावी पुन्हा एकाचवेळी हे सर्व पाहायला मिळणार नाही. याची कृपया कलारसिकांनी नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Sangliसांगली