शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याचा केला निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:15 IST

मामासह मामेभावालाही अटक : डोक्यात दगड, लोखंडी रॉडचा वर्मी घाव

कुपवाड : नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी (वय ३८, मूळ गाव येडूर मांजरी, कर्नाटक, सध्या रा. कुपवाड) याचा मामा व मामेभावाने डोक्यात दगड घालून आणि लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. खुनामागे जमीन किंवा कौटुंबिक वादाचे दुसरे कारणही असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.अटक केलेल्या संशयितांमध्ये संदीप रावसाहेब सावंत (वय ५२), सौरभ संदीप सावंत (वय २२, दोघेही रा. प्रकाशनगर, गल्ली नं.३, कुपवाड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत राहुल सूर्यवंशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील येडूर मांजरीचा आहे. त्याची आई व भाऊ हे दोघे गावी राहतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी राहुल सूर्यवंशी हा कामानिमित्त कुपवाड येथे आला होता. तो कुपवाड औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत मजुरीचे काम करीत होता. मंगळवारी आठवड्याची सुटी असल्याने तो घरी एकटाच होता. राहुल सूर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढीत होता. पीडितेने हा प्रकार नातेवाइकांना सांगितला होता. नातेवाइकांनी राहुलला वेळोवेळी समज दिली होती, तरीही तो ऐकत नव्हता.मंगळवारी दुपारी राहुलने पीडित मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मामेभाऊ सौरभ सावंत व मामा संदीप सावंत याच्या निदर्शनास आला. यावेळी सौरभने रागाच्या भरात सूर्यवंशी याला पकडून मारहाण केली. यावेळी संशयित संदीप सावंत याने लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. संशयित सौरभने शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.

संशयित पोलिसांच्या ताब्यातघटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी संशयित सौरभ सावंत व संदीप सावंत यांना तातडीने ताब्यात घेतले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस