शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: शेत रस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून, मिरज तालुक्यात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:38 IST

बेळंकी - जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्तीत घडली घटना

सदानंद औंधेमिरज : बेळंकी ता.मिरज  येथे शेतातील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या कारणातून डॉ. सुनिल आप्पासाहेब गायकवाड (वय ५०, रा. गायकवाड मळा, बेळंकी) यांच्यावर धारदार हत्यारांने वार करुन पुतण्याने खून केला. बेळंकी - जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्ती, कॅनॉलजवळ काल, गुरुवारी (दि.२३) रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी मृत सुनिल यांचा मुलगा सत्यजित सुनिल गायकवाड यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जितेंद्र सर्जेराव गायकवाड (२७) यास ताब्यात घेतले. बेळंकीत गायकवाड मळा परिसरात पशुवैद्यकतज्ञ सुनिल गायकवाड व जितेंद्र गायकवाड या काका पुतण्यांची शेतजमीन आहे. जमीनीत ये-जा करण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याच्या वादामुळे डॉ. गायकवाड यांनी हा रस्ता चार दिवसापूर्वी बंद केला होता. या रागातून जितेंद्रने चिडून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. डोक्यात, तोंडावर व कपाळावर धारदार हत्यारांने वार केल्याने सुनिल गायकवाड यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी डाॅ.सुनिल यांची दुचाकी रस्त्यावर पडली होती. डॉ. गायकवाड यांचा खून करणारा पुतण्या जितेंद्र गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. रस्त्याच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या घटनेमुळे बेळंकी परिसरात खळबळ उडाली होती. 

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस