विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांचे होणार मूल्यांकन

By Admin | Updated: April 9, 2015 00:03 IST2015-04-08T23:06:21+5:302015-04-09T00:03:34+5:30

शासनाचा निर्णय : एप्रिलअखेर होणार तपासण्या

Unauthorized High Secondary Schools will be evaluated | विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांचे होणार मूल्यांकन

विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांचे होणार मूल्यांकन

सहदेव खोत - पुनवत -राज्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांच्या सर्व तुकड्यांचे या महिनाअखेर मूल्यांकन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. मूल्यांकनासाठी उच्च माध्यमिक कृती समितीने दिलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यामुळे संबंधित शाळा व संस्थाचालक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांची संख्या शेकडोच्या घरात आहे. गेल्या वर्षापासून अशा विद्यालयांतील शिक्षक बिनपगारी राबत आहेत. संस्थाचालकांनी सुद्धा अनेक अडचणींवर मात करीत ही विद्यालये चालविली आहेत.
मध्यंतरी मूल्यांकन होणार, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे मूल्यांकनाकडे डोळे लावून बसलेल्या शिक्षकांच्या आशेवर पाणी पडत होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये तसेच संस्थाचालकांतून नाराजी व्यक्त होत होती. उच्च माध्यमिक शिक्षक कृती समितीच्यावतीने याबाबत नुकतेच मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांना शिक्षणमंत्र्यांनी मूल्यांकनाचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलकांनी पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यालयाकडे धाव घेऊन मूल्यांकनाबाबत शासनाचा अध्यादेश मिळविला आहे.
एकंदरीत मूल्यांकनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे संबंधित शाळांतील शिक्षक व संस्थाचालकांच्या अशा पल्लवित झाल्या असून तपासणी पथकाची प्रतीक्षा संबंधित शाळांना लागली आहे. (वार्ताहर)

असे होणार मूूल्यांकन
दि. १ एप्रिल ते ३० एप्रिल -विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांची तपासणी
दि. ७ मे २०१५ रोजी तपासणी समितीकडून विभागीय शिक्षण उपसंचालकांना अहवाल
दि. ७ मे ते २२ मे २०१५ - अर्जांची तपासणी
दि. ३१ मे २०१५ - अनुदानासाठी पाच शाळांची यादी सादर

Web Title: Unauthorized High Secondary Schools will be evaluated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.