इस्लामपुरातील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:57 IST2018-11-16T12:55:21+5:302018-11-16T12:57:04+5:30

इस्लामपूर -पेठ रस्त्यावरील ख्रिश्चन बंगल्याजवळील अनधिकृत बांधकाम पालिकेने पोलीस बंदोबस्तात पाडले.

Unauthorized construction of the police station in Islampo was under police custody | इस्लामपुरातील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त

इस्लामपुरातील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त

ठळक मुद्देइस्लामपूर -पेठ रस्त्यावरील ख्रिश्चन बंगल्याजवळील अनधिकृत बांधकाम पालिकेने पोलीस बंदोबस्तात पाडले बांधकाम सांगलीच्या कडलास्कर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

इस्लामपूर : इस्लामपूर -पेठ रस्त्यावरील ख्रिश्चन बंगल्याजवळील ते वादग्रस्त बांधकाम अखेर आज नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले.

इस्लामपुरातील या बेकायदेशीर बांधकामावरून पालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीचे प्रमुख विक्रम पाटील आणि राष्ट्रवादीचे शहाजी पाटील यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.

यामध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता.मात्र विकास आघाडीचे प्रतोद विक्रम पाटील यांनी हे बांधकाम पाडून टाकणारच असा इशारा दिला होता.त्यानुसार पोलिसात नगर रचनेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद देऊन बेकायदा बांधकाम करणाऱ्या सांगलीच्या कडलास्कर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

आज सकाळी अकराच्या सुमारास पोलीस बंदोबस्त घेऊन या बांधकामावर जेसीबी चा हातोडा घातला.यावेळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Unauthorized construction of the police station in Islampo was under police custody