उमदी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना पोरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:45+5:302020-12-05T05:05:45+5:30

उमदी प्राथमिक आरोग्य केद्रात पाच उपकेंद्रे येतात. तसेच याठिकाणी २५ पदे मंजूर आहेत; मात्र १३ पदेच कंत्राटी पद्धतीने भरली ...

Umadi Health Center without a medical officer | उमदी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना पोरके

उमदी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना पोरके

उमदी प्राथमिक आरोग्य केद्रात पाच उपकेंद्रे येतात. तसेच याठिकाणी २५ पदे मंजूर आहेत; मात्र १३ पदेच कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५२ गावांतील विविध प्रकरणे दाखल होतात. यावेळी वैद्यकीय तपासणीसाठी उमदी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नाही; यामुळे माडग्याळ अथवा जतला जावे लागते. तसेच शवविच्छेदनासाठीही दुसऱ्या आरोग्य केंद्रातून डॉक्टर येईपर्यंत नातेवाईकांना ताटकळावे लागते. वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेकांची गैरसोय होते. यामुळे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट

आमदारांकडे मागणी

उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व कारभार व कामकाज वैद्यकीय अधिकारी नसल्याने कत्रांटी पद्धतीने असलेल्या आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी व आशा वर्कर्स यांच्या खांद्यावर आहे. अनेक रिक्त पदांच्या जागी कत्रांटी पद्धतीने जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, तसेच सर्व रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी सरपंच निवृत्ती शिंदे, उपसरपंच रमेश हळके व काँग्रेस नेते वहाब मुल्ला यांनी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केली आहे.

फोटो-03umadi01

Web Title: Umadi Health Center without a medical officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.