शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Updated: May 23, 2025 18:53 IST

७२ तासांचा मुख्यमंत्री असताना मंजुरी

अशोक डोंबाळेसांगली : मी राज्याचा ७२ तासांचा मुख्यमंत्री असताना महापुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांसह मराठवाड्याला देण्याच्या फाईलवर सही केली होती. त्यानंतर सत्तेवर आलेले तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामाला खीळ घातली होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. येत्या १५ दिवसात या कामाची निविदा निघेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.सांगलीत भाजपच्या मेळाव्यात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मते मांडली. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात १५० टीएमसी अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवणे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पाला मी मंजुरी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच या कामाला खीळ घातली होती. महायुती पुन्हा सत्तेवर येताच महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या प्रकल्पाला लगेच गती दिली. पाऊस येणार, तो आपण थांबवू शकणार नाही. पण, पुराचे जवळपास १५० टीएमसी पाणी वाहून समुद्रात जात आहे. या पाण्यावर कर्नाटक, महाराष्ट्राचा कुणाचाच हक्क नाही. यामुळेच पुराचे पाणी साठवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला गती देणार आहे. येत्या १५ दिवसात या कामाचे भूमिपूजन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा आहे जागतिक बँकेचा प्रकल्पजागतिक बँकेच्या पथकाने १२ सप्टेंबर २०१९ रोजी पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पात जागतिक बँक सुमारे २३२८ कोटी रुपये, तर राज्य सरकार सुमारे ९९८ कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. एकूण ३ हजार ३२४ कोटी ६३ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.

टॅग्स :SangliसांगलीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे