उद्धव ठाकरे यांनी केले दानवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

By बापू सोळुंके | Updated: February 23, 2024 17:59 IST2024-02-23T17:59:21+5:302024-02-23T17:59:41+5:30

दानवे यांचे वडील एकनाथराव यांचे १६ फेब्रुवारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पक्षप्रमुख ठाकरे हे विदर्भाचा दौरा आटोपून मुंबईला परत जात होते.

Uddhav Thackeray consoled Danve's family | उद्धव ठाकरे यांनी केले दानवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

उद्धव ठाकरे यांनी केले दानवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

संभाजीनगर : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी दुपारी दानवे यांच्या निवासस्थानी जाऊन दानवे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. एकनाथराव आनंदराव दानवे यांना श्रद्धांजली वाहिली.

दानवे यांचे वडील एकनाथराव यांचे १६ फेब्रुवारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पक्षप्रमुख ठाकरे हे विदर्भाचा दौरा आटोपून मुंबईला परत जात होते. या दौऱ्यात त्यांनी आज दुपारी छत्रपती संभाजीनगरात येथील दानवे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्री सगुणाबाई यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. या दुःखद क्षणी मी तुमच्यासोबत आहे तसेच माझ्या कुटुंबातील व्यक्ती हरपला असल्याची भावना ठाकरे यांनी यावेळी यावेळी प्रकट केली. याक्षणी अंबादास दानवे यांच्यासह त्यांची पत्नी अनुराधा,भाऊ देविदास, राजेंद्र, बाळासाहेब आणि मुलगा धर्मराज यांची त्यांनी विचारपूस केली. यावेळी ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते खा.संजय राऊत, मिलिंद नार्वेकर,वरुण सरदेसाई, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि शहरप्रमुख बाळासाहेब थोरात उपस्थित होते..

Web Title: Uddhav Thackeray consoled Danve's family