कातडेप्रकरणी दोघांना कोठडी मिरजेत प्रकार : तिघांवर गुन्हा
By Admin | Updated: December 26, 2014 00:17 IST2014-12-25T22:44:15+5:302014-12-26T00:17:39+5:30
न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

कातडेप्रकरणी दोघांना कोठडी मिरजेत प्रकार : तिघांवर गुन्हा
मिरज : मिरजेत गाईचे कातडे खरेदी करून नेणाऱ्या दोन परप्रांतीयांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिरजेतील उदगाव वेस येथून ट्रकमधून चेन्नईला एम. ईब्राहीम या व्यापाऱ्याकडे जनावरांचे कातडे पाठविण्यात येत होते. ट्रकमध्ये गाईचे व बैलाचे कातडे असल्याच्या तक्रारीमुळे पोलिसांनी २३ लाख ७५ हजार रूपये किमतीचे जनावरांचे कातडे व दहा लाखांचा ट्रक जप्त केला. पीपल्स फॉर अॅनिमलचे अशोक लकडे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिल्याने, कातडे भरलेला ट्रक जप्त करून ट्रकचालक राजेंद्रन जी. गोविंदन (वय ४५), शिवकुमार गोविंद स्वामी (४०, रा. मिन्नुर, जि. वेल्लोर, तामिळनाडू), तसेच ट्रकमध्ये कातडे भरणारा संजय रघुनाथ सोनवणे (४२, रा. मिरज) या तिघांविरूध्द अवैधरित्या गाईचे कातडे बाळगल्याचा गुन्हा दाखल करून गोविंदन व गोविंद स्वामी यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कातड्याच्या विल्हेवाटीबाबत उद्या न्यायालयात निर्णय होणार आहे. कातडे कोणत्या प्राण्याचे आहे, याबाबतचा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. (वार्ताहर)