माेटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:37+5:302021-01-02T04:23:37+5:30

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे महामार्गावर दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी व माेटारीच्या अपघातात ऊसतोड मजूर गंभीर ...

The two-wheeler was injured in the collision | माेटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

माेटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे महामार्गावर दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी व माेटारीच्या अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला. महादेव गुलाब भोरे (वय ४५, रा. माळेवाडी. ता. पाथरी जि. परभणी) असे गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड कामगाराचे नाव आहे.

महादेव भोरे हे ऊसतोड कामगार म्हणून परिसरात काम करतात. ते दुपारी बाराच्या दरम्यान दुचाकीवरून (क्र. एमएच २२ एबी २१७५) काळमवाडीच्या दिशेने आशियाई महामार्ग ओलांडून नेर्लेकडे येत होते. मुख्य चौकाकडे जात असताना कोल्हापूरहून भरधाव वेगाने कऱ्हाडकडे जाणाऱ्या माेटारीने (क्र. एमएच १४ एचके ९५३३) महादेव भोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत भोरे महामार्गावर आपटल्याने त्यांच्या कानाला, खांद्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून तत्काळ इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. माेटारचालक बाळू कोंडीबा गुंजाळ (रा. पुणे) हे स्वतःहून कासेगाव पोलिसात हजर झाले व त्यांनी अपघाताची फिर्याद दिली. महादेव भोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची नोंद कासेगाव पोलिसांत झाली आहे.

Web Title: The two-wheeler was injured in the collision