शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Accident: भरधाव वेगामुळे झाला घात, कडेगावात दुचाकी-ट्रॅक्टर अपघात दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 17:35 IST

ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोराची धडक झाली. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्तस्त्राव झाल्याने दोघे जागीच ठार झाले.

कडेगाव : कडेगाव शहरालगत विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका हॉटेल समोर ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेश येथील दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.रितेश राजकुमार विश्वकर्मा (वय-२६ मूळ रा. बौजापूर अमरहट) व वीरेंदर गोरखनाथ खरवार (३४ मूळ रा देनुवा, जैनापूर सध्या दोघे रा. कडेगाव औद्योगिक वसाहत) अशी मृतांची नावे आहेत. गौतम अनिल खरवार (वय १९ रा रामपूर उत्तरप्रदेश) याने याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रितेश व वीरेंदर हे दोघे कडेगाव येथील अद्योगिक वसाहतीतील दत्त टेक्सटाईलमध्ये कामगार म्हणून गेले अनेक दिवसांपासून काम करीत होते. शुक्रवारी रात्री उशिरा दोघे दुचाकीवरुन (एम. एच. १० डीएल ३३४०) वगाने कडेगाव शहरातून अद्योगिक वसाहतीकडे कडेगाव-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते. यावेळी समोरील ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोराची धडक झाली. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्तस्त्राव झाल्याने दोघे जागीच ठार झाले. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात