कवलापुरातील दुचाकी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:25 IST2021-03-06T04:25:32+5:302021-03-06T04:25:32+5:30

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथून अज्ञाताने दुचाकी लंपास केली. याप्रकरणी विष्णू शिवाजी माळी (रा. कवलापूर) यांनी ग्रामीण पोलिसांत ...

Two-wheeler stolen from Kavalapur | कवलापुरातील दुचाकी चोरीस

कवलापुरातील दुचाकी चोरीस

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथून अज्ञाताने दुचाकी लंपास केली. याप्रकरणी विष्णू शिवाजी माळी (रा. कवलापूर) यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. ३) गावातील एका फार्महाऊसबाहेर त्यांनी दुचाकी लावलेली होती. यावेळी अज्ञाताने ती लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

---

सांगलीत मोबाईल लंपास

सांगली : शहरातील शिवशंभो चौक परिसरातून अज्ञाताने घरातील मोबाईल लंपास केला. याप्रकरणी रूक्साना आयूब शेख (रा. शिवशंभो चौक, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

अज्ञाताने घरात प्रवेश करून मोबाईलची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

---

सांगलीतून दुचाकी लंपास

सांगली : शहरातील जुन्या बुधगाव रोडवर असलेल्या वाल्मिकी आवासमधून दुचाकी लंपास करण्यात आली. याप्रकरणी सचिन सखाराम शिंदे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पेंटरचे काम करणारे शिंदे आवासमध्ये राहण्यास आहेत. गुरुवारी (दि. ४) त्यांच्या घराजवळ लावलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Two-wheeler stolen from Kavalapur