सांगलीतून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:31+5:302021-09-19T04:26:31+5:30
सांगली : शहरातील ख्वॉजा काॅलनी परिसरातून चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी महेश तुळशीदास कोळी (रा. ...

सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील ख्वॉजा काॅलनी परिसरातून चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी महेश तुळशीदास कोळी (रा. गजानन कॉलनी, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. गुरुवार, दि. १६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
----
सांगलीतून मोबाईल लंपास
सांगली : शहरातील पंचशीलनगर चाैक परिसरातून गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी मोहन निवृत्ती निकम यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. शुक्रवार, दि. १७ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.
----
दूधगावमधून तांब्याची तार लंपास
सांगली : दूधगाव (ता. मिरज) येथे राेहित्रामधील ८० किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेताना आढळून आली. २५ हजार रुपये किमतीची तार कापून ती जाळून त्यातील तार काढण्याचा प्रयत्न चालू होता. कर्मचारी विनायक मधूकर पोतदार यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत याची फिर्याद दिली आहे.