माधवनगरमधून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:38+5:302021-07-05T04:17:38+5:30

सांगली : माधवनगर येथील मंगळवार पेठ परिसरातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी शरद तुकाराम बांगर ...

Two-wheeler lampas from Madhavnagar | माधवनगरमधून दुचाकी लंपास

माधवनगरमधून दुचाकी लंपास

सांगली : माधवनगर येथील मंगळवार पेठ परिसरातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी शरद तुकाराम बांगर (रा. नागोबा मंदिराजवळ, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

-----

बेकायदा दारूविक्रीवर कारवाई सुरूच

सांगली : जिल्ह्यातील आष्टा, उमदी, जत पोलिसांनी बेकायदा दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई केली. आष्टा पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी दारूच्या २० बाटल्या जप्त करण्यात आल्या. जत पोलिसांनी कारवाई करत १५ बाटल्या तर उमदी पोलिसांनीही १५ बाटल्या दारू जप्त करत संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

-----

होम आयसोलेशनमधील रुग्णसंख्येत वाढ

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून नऊशेवर नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या ८२०९ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

-----

कुपवाड फाटा येथे रस्त्याची दुरवस्था

सांगली : नेहमी वर्दळीचा असलेल्या कुपवाड फाटा येथे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी विश्रामबाग, कुपवाडहून नेहमीच अवजड वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे या चौकातच रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

-----

ऑनलाइन शिक्षणाला नेटमुळे खोळंबा

सांगली : सध्या सर्वत्र ऑनलाइन पध्दतीने वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, शहरासह अनेक भागात नेटच्या अडचणी येत आहेत. शहरात गेल्या आठवड्यापासून एका खासगी कंपनीचे नेटवर्क खराब झाल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला खोडा बसला आहे.

Web Title: Two-wheeler lampas from Madhavnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.