मिरजेत अपघातात दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:21+5:302021-07-09T04:18:21+5:30

------------------------- एरंडोलीत सोन्याचे दागिने लंपास मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे रुक्मिणी नारायण जाधव ( वय ७० ) या ...

Two-wheeler injured in Miraj accident | मिरजेत अपघातात दुचाकीस्वार जखमी

मिरजेत अपघातात दुचाकीस्वार जखमी

-------------------------

एरंडोलीत सोन्याचे दागिने लंपास

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे रुक्मिणी नारायण जाधव ( वय ७० ) या वृद्धेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ व मंगळसूत्र हिसकावून दोघांनी पलायन केले. याबाबत जाधव यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. रुक्मिणी जाधव या एरंडोली - आरग रस्त्यावरील म्हसोबा देवालयात गेल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ व मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरुन बेडगच्या दिशेने पोबारा केला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

----------------------------

महिलेचा विनयभंग

मिरज : महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल गणेश महादेव पुजारी (वय ३१, रा. सुभाषनगर, मिरज) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला पती व मुलासोबत एका दुकानासमोर थांबली असता, तेथे येऊन पुजारी याने अश्लील वर्तन केले. याचा पीडितेच्या पतीने जाब विचारला असता, त्यांना पुजारी याने शिवीगाळ, दमदाटी केल्याने पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Two-wheeler injured in Miraj accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.