खुजगावला ट्रकची दुचाकीस धडक; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST2021-07-01T04:20:04+5:302021-07-01T04:20:04+5:30
कोकरूड : खुजगाव (ता. शिराळा) येथील जलसेतूच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून ...

खुजगावला ट्रकची दुचाकीस धडक; एक जखमी
कोकरूड : खुजगाव (ता. शिराळा) येथील जलसेतूच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली. बुधवारी कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रकचालक मिलिंद अशोक पाटील (रा. कोपर्डे, ता.कऱ्हाड) ट्रक (क्र. एमएच ५० एन ८०२५) घेऊन कोकरूडहून शेडगेवाडीकडे जात होता. दारूच्या नशेत भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाने खुजगाव येथील जलसेतूजवळ असलेल्या वळणावर दुचाकीला (क्र. एमएच १० एचझेड १०८) पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार राजू दगडू कासार (वय ५०) जखमी झाले.