शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुकरीने दहशत माजवत दोघांवर खुनी हल्ला; जखमींवर उपचार सुरु, सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:17 IST

सांगली : गावभागातील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रात्री कुकरीने दहशत माजवत खुनी हल्ला करण्यात आला. हल्ल्यात होमेंद्र राजेंद्र भोसेकर (२४, ...

सांगली : गावभागातील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रात्री कुकरीने दहशत माजवत खुनी हल्ला करण्यात आला. हल्ल्यात होमेंद्र राजेंद्र भोसेकर (२४, रा. मीरा हौसिंग सोसायटी) आणि रशीद राजासाब मुल्ला (२३, रा. राणाप्रताप चौक, सांगली) हे दोघे गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, होमेंद्र भोसेकर हा एका मोबाइलच्या सिम कार्ड कंपनीत नोकरीस आहे. तेथे काम करणाऱ्याबरोबर त्याचा वाद झाला होता. वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता. शुक्रवारी काम संपल्यानंतर भोसेकर हा गावभागातून निघाला होता.

मारुती चौकाजवळ तो थांबला. त्या ठिकाणी काहीजण आले होते. त्यांच्यात वाद झाला. यावेळी कुकरी काढून दहशत माजवण्यात आली. वाद मिटवण्यासाठी रशीद तेथे गेला होता; मात्र त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. यावेळी भोसेकर याच्या डोक्यात, हातावर, मानेवर वार झाले.हल्ल्यानंतर परिसरात मोठी गर्दी होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेला पाठवले. जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Knife attack in Sangli: Two injured due to old dispute.

Web Summary : In Sangli, a knife attack injured two men, Homendra Bhosekar and Rashid Mulla, due to a past dispute. The incident occurred near Maruti Chowk. Both are receiving treatment at a civil hospital. Police are investigating.