शिरटेतील दोघा सावकारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST2021-03-18T04:26:16+5:302021-03-18T04:26:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील एकास सावकारी व्याजाने दिलेल्या ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात १ लाख ...

Two moneylenders arrested | शिरटेतील दोघा सावकारांना अटक

शिरटेतील दोघा सावकारांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील एकास सावकारी व्याजाने दिलेल्या ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात १ लाख १७ हजार रुपयांची वसुली करणाऱ्या शिरटे येथील दोघा सावकार भावांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने दोघांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हुसेन इस्माईल शेख आणि मेहबुब इस्माईल शेख (दोघे रा. शिरटे) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. या दोघाविरुद्ध शरद जयवंतराव खोत यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. मार्च १५ मध्ये खोत यांनी हुसेन शेख याच्याकडून ५० हजार रुपये घेतले होते. या पैशांपोटी त्यांनी शेख याला १ लाख १७ हजारांची परतफेड केली होती. मात्र तरीही आणखी पैसे पाहिजेत, असा तगादा लावत या दोघा भावांनी खोत यांना त्रास दिला होता. त्यांच्या त्रासास कंटाळून शेवटी खोत यांनी पोलिसात धाव घेतली.

Web Title: Two moneylenders arrested