टायगर ग्रुपच्या दोघांना खुनी हल्ल्याप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST2021-07-31T04:27:33+5:302021-07-31T04:27:33+5:30
सांगली : चोरलेली गाढवे परस्पर विक्री केल्याच्या रागातून एकाला मारहाण करीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टायगर ग्रुपच्या शहर अध्यक्षांसह दोघांना ...

टायगर ग्रुपच्या दोघांना खुनी हल्ल्याप्रकरणी अटक
सांगली : चोरलेली गाढवे परस्पर विक्री केल्याच्या रागातून एकाला मारहाण करीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टायगर ग्रुपच्या शहर अध्यक्षांसह दोघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पिंटू सुरेश माने आणि प्रवीण पोपट माने अशी संशयितांची नावे असून, त्यांनी २१ फेब्रुवारी २०२० रोजी हरिपूर रोड येथे राहणाऱ्या भैया बाबासाहेब माने यास लोखंडी गज आणि काठीने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे पसार होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २१ फेब्रुवारी २०२० रोजी अंकलीजवळ पिंटू माने, अरविंद माने, अमोल माने, मारुती माने, रोहित माने, सहदेव माने, प्रवीण माने यांच्यासह अनोळखी पाच ते सहा जणांनी भैया माने यास मारहाण केली. मारहाणीनंतर भैया याने सांगली ग्रामीण पोलिसांत संशयिताविरोधात फिर्याद दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पिंटू माने आणि प्रवीण माने हे दोघे पसार होते. ते सांगली परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्यासह पथकाने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.