शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेकने विसर्ग सुरू; वारणा, कोयनेतूनही विसर्ग वाढविला 

By अशोक डोंबाळे | Updated: July 27, 2023 17:07 IST

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात ८१.१४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ६६ टक्के भरले आहे. धरणात एक लाख ६१ हजार ७४७ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणातून गुरुवारी दुपारी चारपासून एक लाख ७५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली. सांगली जिल्ह्यासह वारणा, कोयना धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे तेथून विसर्ग वाढविला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. वारणा (चांदोली) धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासांत ५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दिवसभरही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणात सध्या २९.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ८४ टक्के भरल्यामुळे धरणातून विद्युतगृह आणि गेटमधून तीन हजार १७५ क्युसेकने विसर्ग चालू आहे.कोयना धरण क्षेत्रातही ११९ मिलीमीटर पाऊस झाला असून, धरणात सध्या ६४.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ६१.११ टक्के भरले आहे. धरणाच्या विद्युतगृहातून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.सांगली जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढत आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वारणा धरणावरील आठ पूल पाण्याखालीच आहेत.

मिरज तालुक्यात सर्वाधिक ३१.५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) : मिरज ३१.४५ (१७४.४), जत १९.७ (१३८.४), खानापूर १५.१ (१०५.१), वाळवा १२.९ (१९२.५), तासगाव २१.५ (१७७.५), शिराळा २१.७ (४८९.२९), आटपाडी ७.५ (१०८.३), कवठेमहांकाळ २२.४ (१४९.१), पलूस २१.१ (१६२.४), कडेगाव ११ (१२५.९).

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरण