कुचीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार
By Admin | Updated: August 23, 2015 00:37 IST2015-08-23T00:36:58+5:302015-08-23T00:37:59+5:30
कुचीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार

कुचीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार
कवठेमहांकाळ : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) फाट्याजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकून दोघे ठार झाले. संभाजी महादेव पाटील (वय २०, जुजारपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) व सचिन ऊर्फ संभाजी बापू लोखंडे (३५, घोरपडी, ता. कवठेमहांकाळ) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री बारा वाजता झाला.
मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर कुची गावानजीक टायर फुटल्याने एमएच ४५-९१६ क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सचिन लोखंडे व संभाजी पाटील मिरजेहून आपल्या गावी जुजारपूर व घोरपडीला दुचाकीवरून (एमएच १० एजे २२३१) निघाले होते. रात्रीची वेळ असल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थांबलेल्या ट्रकवर पाठीमागून आदळली. ही धडक इतकी जोराची होती की, दोघेही रस्त्यावर उडून पडले. या अपघातात सचिन लोखंडे जागीच ठार झाला, तर संभाजी पाटील गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला. हवालदार नामदेव देवकते अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)