शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

Sangli Accident News: आईसमोर लेकीने सोडले प्राण; दुचाकींच्या धडकेत दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:20 IST

अपघातात डोळ्यादेखत मुलीने प्राण सोडल्याने जखमी आईला धक्का बसला

विटा : बलवडी (भा.) येथून विट्याकडे येणाऱ्या व विट्याहून आळसंदकडे निघालेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन ठार झाले. अपघातात डोळ्यादेखत मुलीने प्राण सोडल्याने जखमी आईला धक्का बसला. महेश्वरी आनंदा पाटील (वय २५, रा. मायाक्कानगर, विटा) असे मृत मुलीचे नाव असून दुसऱ्या दुचाकीवरील विनायक दादासाहेब पाटील (वय ३५, रा. बलवडी-भा.) या तरुणाचाही मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.विटा येथील महेश्वरी पाटील व त्यांच्या आई अनिता भगत या दोघी दुचाकीवरून (क्र. एमएच १०, ईएन ४२८५) विट्याहून आळसंदकडे नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या, तर बलवडी (भा.) येथील विनायक पाटील हे दुचाकीवरून (एमएच १२, सीएस १८६४) आळसंदहून विट्याकडे निघाले होते. त्यावेळी चक्रधारी सूतगिरणीजवळ या दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघातात दुचाकीवरील महेश्वरी पाटील व दुसऱ्या दुचाकीवरील विनायक पाटील हे गंभीर जखमी झाले, तर महेश्वरी यांची आई अनिता भगत या किरकोळ जखमी झाल्या. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी तिघांना तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, महेश्वरी पाटील व विनायक पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले विनायक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने विटा व बलवडी (भा.) परिसरावर शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Accident: Daughter Dies Before Mother's Eyes; Two Killed

Web Summary : Two killed in a head-on collision near Vita. Maheshwari Patil and Vinayak Patil died during treatment. Maheshwari's mother was injured. The accident occurred near Chakradhari Sutgirni, causing grief in Vita and Balwadi.