शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कारच्या धडकेत दोन महिला ठार, दोघे जखमी; देवदर्शनासाठी निघाले असता घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 15:56 IST

सुरेंद्र शिराळकर आष्टा : चार चाकीच्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. अश्विनी पंकज निकम (वय३७ रा. विक्रोळी मुंबई) ...

सुरेंद्र शिराळकरआष्टा : चार चाकीच्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. अश्विनी पंकज निकम (वय३७ रा. विक्रोळी मुंबई) व रुपाली सचिन कांबळे (४० रा. आष्टा मिसळवाडी) असे मृत महिलांची नावे आहेत. तर, देवांशी पंकज निकम (७) व अक्षय गजानन उल्लाळकर (३० रा. मुंबई) हे दोघे जखमी झाले. हा अपघात आष्टा-औदुंबर रस्त्यावर आज, शनिवारी सकाळच्या सुमारास घडला.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील गजानन उल्लाळकर पती पत्नी औदुंबर दत्त दर्शनासाठी शुक्रवारी आले होते. त्यांची मुलगी अश्विनी व नात देवांशी दत्त दर्शनासाठी येणार होते. त्यामुळे बंधू अक्षय उल्लाळकर हे मुंबईहून अश्विनी व देवांशी यांना घेऊन पुणे येथे शुक्रवारी रात्री आले. तेथून मित्राची चार चाकी क्रमांक (एम एच १२ डब्ल्यू ई ६७७५) घेऊन पहाटे दत्त दर्शनासाठी निघाले. पुणेहुन आष्टा ते औदुंबर जात असताना एका लॉजच्या नजीक समोरून रूपाली कांबळे अचानक गाडीच्या समोर आल्या. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षय उल्लाळकर यांनी ब्रेक दाबला. मात्र रूपाली कांबळे यांना धडकून गाडी पुढे उसाच्या शेतात गेली. गाडीच्या धडकेत रूपाली कांबळे ठार झाल्या. तर गाडीमधील अक्षय यांची बहीण अश्विनी निकम यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याही जागीच ठार झाल्या. भाची देवांशी निकम व अक्षय उल्लाळकर हे जखमी झाले. जखमींना आष्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी अश्विनी निकम यांच्या आई वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. दत्त दर्शनासाठी येणाऱ्या लेकीवर काळाने घाला घातल्याने आई-वडिलांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, सतीश शिंदे, जयदीप कळेकर यांच्यासह पोलीस दाखल झाले. अश्विनी निकम व रूपाली कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू