शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मित्राचा हळदी कार्यक्रम करून परत येताना काळाचा घाला, डंपरच्या धडकेत दोघे ठार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:12 IST

इस्लामपूर : इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील राजारामबापू कारखान्याच्या गाडी तळाजवळ थांबलेल्या माेटारीला भरधाव वेगात आलेल्या डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दोघे जागीच ...

इस्लामपूर : इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील राजारामबापू कारखान्याच्या गाडी तळाजवळ थांबलेल्या माेटारीला भरधाव वेगात आलेल्या डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. या धडकेत माेटार १५ फूट फरफटत गेली. माेटारीतील दोघांच्याही अंगावरून डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. मित्राच्या हळदीचा कार्यक्रम करून परतत असताना ही घटना घडली. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला.प्रांजल अभिनेश तिवारी (रा. नऱ्हे-पुणे) आणि किशोर नंदकुमार गेजगे (रा. सुभाषनगर, मिरज) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचे मित्र दीपक द्विवेदी, आनंद आर्यन आणि निरंजन कोकाटे यांच्या डोळ्यांसमोर या दोन मित्रांचा करुण अंत झाला. या अपघातात माेटारीचे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दीपक कुमार द्विवेदी (मूळ रा. रिवा-मध्य प्रदेश, सध्या-सिंहगड कॉलेज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात डंपरचालकाविरुद्ध अपघात करून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. अपघातानंतर डंपरचालकाने वाहनासह पलायन केले.प्रांजल व किशाेरसह त्यांचे मित्र इस्लामपूरमधील प्रतीकाज बुचडे या मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आले होते. हे सर्वजण इस्लामपूरमधील मित्राची माेटार (एमएच ४७ डब्ल्यू ६२८०) घेऊन शनिवारी पलूस येथे गेले. रात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम करून सर्वजण मध्यरात्रीनंतर इस्लामपूरकडे येत होते. रात्री दोनच्या सुमारास राजारामबापू कारखाना परिसरातील गाडी तळाजवळ लघुशंकेसाठी त्यांनी माेटार थांबविली. पार्किंग लाईट लावून अगोदर प्रांजल आणि किशोर हे दोघे जाऊन आले व माेटारीच्या पाठीमागे थांबले.

त्यानंतर दीपक आणि इतर दोघे माेटारीपासून बाजूला गेले. याचवेळी ताकारीकडून इस्लामपूरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या डंपरने माेटारीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये प्रांजल आणि किशोर हे दोघेही माेटारीसह फरफटत गेले. यातच अंगावरून डंपरची चाके गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यु झाला. त्यानंतर डंपरचालकाने वाहनासह तेथून पळ काढला. हवालदार उदय पाटील अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू